KS Chithra : श्रीरामाचा जप करण्याचे आवाहन करणार्‍या प्रसिद्ध गायिका चित्रा यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका !

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केले होते आवाहन !

प्रसिद्ध गायिका चित्रा

थिरूवनंतपूरम् – केरळमधील प्रसिद्ध गायिका के.एस्. चित्रा यांनी सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ करून त्यांच्या चाहत्यांना श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दीप लावण्याचे आणि प्रभु श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन केले होते. या पोस्टवर चाहत्यांनी गायिकेचे अभिनंदन केले, तर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला. काहींनी ‘चित्रा यांनी श्रीराममंदिराला पाठिंबा देणे आवश्यक नव्हते’, तर काहींनी ‘श्रीराममंदिराला पाठिंबा देऊन त्यांनी एका राजकीय पक्षाची बाजू घेतली’, असे म्हटले.

केरळला ‘तालिबान’ बनू दिले जाणार नाही ! – व्ही. मुरलीधरन्, केंद्रीय मंत्री  

एका वृत्तसंस्थेशी बोलतांना व्ही. मुरलीधरन् म्हणाले की, चित्रा यांना सामाजिक माध्यमांवरून धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना लक्ष्य केले जात आहे. केरळमध्ये दीप लावणे आणि प्रभु श्रीरामाचा नामजप करणे गुन्हा आहे का ? अशा गुंडगिरीवर पोलीस गप्प का ? जे लोक शबरीमालाच्या परंपरा मोडण्याचा प्रयत्न करत होते, तेच लोक चित्रा यांना विरोध करण्यामागे आहेत. केरळमधील विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही पक्ष अशा घटकांना प्रोत्साहन देत आहेत.

के.एस्. चित्रा ४० वर्षांपासून गायनक्षेत्रात सक्रीय !

चित्रा या ६० वर्षांचा असून त्या ४० वर्षांपासून गायनक्षेत्रात सक्रीय आहेत. त्या ‘लिटल नाइटिंगगेल ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध भाषांमध्ये २५ सहस्रांहून अधिक गाणी ध्वनीमुद्रित केली आहेत.

संपादकीय भूमिका

  • चित्रा या केरळमधील आहेत. तेथील साम्यवादी हिंदूंच्या परंपरांचे पालन करणारे आणि त्याला पाठिंबा देणार्‍यांना कशा प्रकारे विरोध करतात, हे यातून दिसून येते !
  • अन्य वेळी धर्मस्वातंत्र्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य यांचा ढोल बढवणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?