श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम !
अयोध्या – अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता पूर्ण झाली आहे. याच क्रमाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने कार्यक्रमाच्या मुख्य पुजार्यांची घोषणा केली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून चालू झाली आहे. प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजनाने ही प्रक्रिया चालू झाली. प्राणप्रतिष्ठा विधींच्या सर्व प्रक्रियेचा समन्वय आणि मार्गदर्शन १२१ आचार्य करणार आहेत. वाराणसी येथील देशातील सर्वांत मोठे ज्योतिषी गणेश्वर शास्त्री द्रविडजी हे सर्व प्रक्रियेचे निरीक्षण, समन्वय आणि मार्गदर्शन करतील. त्याच वेळी वाराणसीचे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित आचार्यपदाचे दायित्व सांभाळतील.
सौजन्य एमपीएस हिन्दी
१. आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविडजी हे ज्योतिष आणि धार्मिक शास्त्र यांचे महान अभ्यासक मानले जातात. देशातील महान ज्योतिषी म्हणून त्यांची ख्याती आहे.
२. श्रीराममंदिराच्या पायाभरणीसाठी शुभमुहूर्त आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढला होता. काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाचा शुभमुहूर्तही त्यांनीच ठरवला होता. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभमुहूर्त त्यांनीच निश्चित केला आहे.
३. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित हे १७ व्या शतकातील प्रसिद्ध पंडित गागा भट्ट यांचे वंशज आहेत.