जळगाव – येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने १६ ते २६ जानेवारी या कालावधीत ‘अयोध्या सप्ताह आनंद सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, कारसेवकांचे मनोगत, सत्यनारायण पूजा असे नियोजन आहे. या सप्ताहाचा जळगाव जिल्ह्यातील अधिकाधिक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी केले आहे.
श्रीराम मंदिराचे वैशिष्ट्य
जळगावनगरीचे ग्रामदैवत असलेले श्रीराम मंदिर संस्थान हे कान्हादेशातील प्रमुख संस्थानांपैकी आहे. या संस्थानास वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेली आहे. येथील भगवान श्रीरामाची सुंदर अशी उत्सवमूर्ती, श्रीराम रथ, तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणारी श्री संत मुक्ताबाई रामपालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाली. या चैतन्यमय मूर्तीविषयी भाविकांची मनोकामनापूर्ती झाल्याचे अनुभव येत असतात.