पाकच्या बलुचिस्तानमधील मशिदीजवळ झालेल्या भीषण बाँबस्फोटात ५४ जण ठार !

मस्तुंग येथे सकाळी साडेदहा वाजता झालेल्या भीषण बाँबस्फोटामध्ये आतापर्यंत ५४ जण ठार झाल्याचे आणि ३० हून अधिक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. येथे मदिना मशिदीजवळ हा बाँबस्फोट झाला.

मणीपूर येथे आंदोलकांचे राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर आक्रमण !

राज्यातील हिंसाचार समाप्त करण्यासाठी मूलगामी उपाय न काढल्यानेच हिंसाचार पुन:पुन्हा डोके वर काढत आहे, हेच अशा घटनांतून म्हणता येईल !

खलिस्तानी केवळ भारतच नव्हे, तर कॅनडासाठीही धोकादायक !

‘तुम्ही भारताला क्षणभर विसरू शकता; पण ज्या प्रकारे आतंकवादी शक्ती कॅनडात डोके वर काढत आहे. ती केवळ भारतासाठीच नाही, तर कॅनडासाठीही धोक्याची आहे’, असे देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १७ सप्टेंबर या दिवशी ‘जी-२०’ची परिषद संपल्यानंतर ही माहिती दिली.

कॅनडामध्ये लोकशाहीच्या नावाखाली हिंसाचाराचे समर्थन केले जात आहे !

स्वतःच्या राजकीय लाभासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो खलिस्तान्यांसमोर केवळ झुकलेच नाही, तर त्यांनी लोटांगण घातले आहे, हे संपूर्ण जग पहात आहे.

पुणे येथे ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या गर्दीत नृत्य करण्यासाठी मुले-मुली पाहिजेत’, अशा आशयाचे विज्ञापन प्रसिद्ध !

विसर्जन मिरवणुकीत पैसे घेऊन चित्रपट गीतांवर हिडीस नृत्य करणारे नव्हे, तर भजन आणि नामजप यांच्या गजरात भक्तीभावाने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणारे भाविक आवश्यक असतात.

अवैध स्थलांतर रोखण्यासाठी युरोपीय संघाच्या धोरणांमध्ये पालट आवश्यक ! – हंगेरीचे पंतप्रधान

‘आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करू; परंतु आम्हाला अवैध स्थलांतर थांबवायचे असेल, तर युरोपीय संघाच्या धोरणांमध्ये पालट करणे आवश्यक आहे’, -हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन

नेरूळ (नवी मुंबई) येथे बौद्ध कुटुंबाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने विरोध !

व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यांचा ढोल बडवणारे  अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपून बसतात ?

२६/११ या मुंबईतील आतंकवादी आक्रमणाच्‍या प्रकरणी तहव्‍वूर हुसैन राणाविरोधात आरोपपत्र प्रविष्‍ट !

या आक्रमणातील आरोपी डेव्‍हिड हेडली याने राणा यास ईमेल पाठवल्‍याची, तसेच राणासमवेत एकत्रित प्रवास केल्‍याचीही माहिती पोलिसांच्‍या हाती लागली आहे.

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आय.एस्.आय.ने हाती घेतली ‘के’ (खलिस्तान) नावाची आंतरराष्ट्रीय मोहीम !

पाकिस्तानने बलुचिस्तान, सिंध आदी प्रांतांतील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा निकटच्या भविष्यात त्याला त्याच्या अर्ध्याअधिक भूमीवरच तुळशीपत्र ठेवावे लागेल !

आम्ही चीनच्या जहाजाला बंदरावर थांबण्याची अनुमती दिलेली नाही !

चीनचे जहाज हेरगिरी करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेच्या बंदरावर येणार असल्याने भारताने अनुमती देण्यास विरोध केला होता.