मस्तुंग (बलुचिस्तान) – येथे सकाळी साडेदहा वाजता झालेल्या भीषण बाँबस्फोटामध्ये आतापर्यंत ५४ जण ठार झाल्याचे आणि ३० हून अधिक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. येथे मदिना मशिदीजवळ हा बाँबस्फोट झाला. येथे लोक ईदच्या निमित्ताने काढण्यात येणार्या मिरवणुकीसाठी एकत्र आले असतांना हा स्फोट घडवून आणण्यात आला. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही.
🇵🇰Au moins 52 morts et des dizaines de blessés dans un attentat suicide au #Pakistan. L’explosion est survenue près de la mosquée Madina alors que des fidèles se rassemblaient pour l’Aïd Miladun Nabi, l’anniversaire de la naissance du prophète Mahomet. https://t.co/cjArQxJL3y
— France•TV New Delhi (@F2newdelhi) September 29, 2023
पोलिसांनी सांगितले की, हा आत्मघातकी बाँबस्फोट होता. स्फोट घडवणारा आतंकवादी मिरवणुकीजवळ उभ्या असणार्या पोलीस अधिकार्याच्या गाडी जवळ उभा होता आणि त्याने तेथेच स्फोट घडवला.