अवैध स्थलांतर रोखण्यासाठी युरोपीय संघाच्या धोरणांमध्ये पालट आवश्यक ! – हंगेरीचे पंतप्रधान

हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन

बुडापेस्ट (हंगेरी) – ब्रुसेल्सच्या अयशस्वी ठरलेल्या धोरणांमुळे अवैध शरणार्थींची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हंगेरीने या वर्षीच १ लाख २५ सहस्रांहून अधिक घुसखोरांचे अवैधरित्या सीमा ओलांडण्याचे प्रयत्न रोखले आहेत.

‘आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करू; परंतु आम्हाला अवैध स्थलांतर थांबवायचे असेल, तर युरोपीय संघाच्या धोरणांमध्ये पालट करणे आवश्यक आहे’, असे हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.