आमच्या विरोधात फतवा निघाला होता ! – ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकार आणि निर्मात्या पल्लवी जोशी
एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?
एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?
जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे केली.
श्री. देवेंद्र पाटील म्हणाले, ‘‘काश्मिरी हिंदूंवर त्या काळात जे अत्याचार झाले, त्याची दाहकता लोकांपर्यंत पोचणे अत्यावश्यक आहे. त्या काळात हिंदूंनी जे भोगले किमान यापुढील काळात तरी तशी वेळ येऊ नये यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय जाणे आवश्यक आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ ही गोष्ट काश्मीरची आणि काश्मीरमधील हिंदु पंडितांची आहे. त्यांच्यावरील अत्याचार आजपर्यंत जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आले. या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना माहिती होईल.
काश्मिरी हिंदूंवर त्या काळात जे अत्याचार झाले, त्याची दाहकता लोकांपर्यंत पोचणे अत्यावश्यक आहे. त्या काळात हिंदूंनी जे भोगले किमान यापुढील काळात तरी तशी वेळ येऊ नये
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ७०० काश्मिरी कुटुंबांशी चर्चा करून आणि ३ वर्षे अभ्यास केल्यानंतर हिंदूंची वस्तूस्थिती मांडणारा बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे.
कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असतांना पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे कूचकामी का ठरली ? हिंदू स्वतःचे रक्षण का करू शकले नाहीत ? काश्मीरमधील तत्कालीन सरकारने या वंशविच्छेदाला कसे साहाय्य केले ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ !
काश्मिरी पंडितांवर प्रचंड अत्याचार होऊनही एकाही पंडिताने शस्त्र उचलले नाही किंवा एकही जण अतिरेकी झाला नाही. हिंदूंच्या सहिष्णुतेचे हे मोठे उदाहरण आहे. आपल्याच देशातील लोकांना आपले घरदार सोडून दुसर्या भागात बळजोरीने स्थायिक व्हावे लागणे, हे लज्जास्पद आहे.
भारतात राष्ट्रभक्तांनी कोणतीही कारवाई केल्यास राष्ट्रविरोधक एकत्र येतात. कुठे ‘मॉब लिंचिंग’ झाल्यास साम्यवादी आणि तथाकथित बुद्धीजीवी एकवटतात; पण हिंदु पंडितांचा मोठा नरसंहार होऊनही साम्यवाद्यांनी अश्रू ढाळले नाहीत किंवा सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले नाहीत.
जगातील एकाही देशात आतंकवादाचे उदात्तीकरण होत नाही; पण भारतात मात्र ते सर्रासपणे होते. तेव्हा कुणीही अशा चित्रपटांना विरोध करत नाही. मग काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारलेल्या या चित्रपटालाच विरोध का ? हा दडपलेला इतिहास जगासमोर का येऊ दिला जात नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातच आहेत !