श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या बैठकीत निर्णय
न्यासाच्या प्रवक्त्याचीही होणार नियुक्ती
महासचिव पदाच्या नावावर अद्याप एकमत नाही

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या २२ जुलैला झालेल्या बैठकीत ९ संतांची धार्मिक समिती स्थापन करण्यात आली. यात अयोध्येतील ५ संत आणि न्यासाचे ४ संत यांचा समावेश आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तसेच समाज आणि माध्यमे यांच्याशी नियमित संवाद साधण्यासाठी न्यासाने अधिकृत प्रवक्ता नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत महासचिव आणि ३ विश्वस्त यांची नावे निश्चित केली जाणार होती; मात्र ती होऊ शकली नाही. बैठकीत विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव बजरंग लाल बागडा यांचे नाव सूचवण्यात आले होते; परंतु त्यावर एकमत होऊ शकले नाही. अयोध्येतील संतांना स्थानिक व्यक्तीला महासचिव बनवायचे आहे. त्यामुळे हा विषय पुढे ढकलण्यात आला. पुढील बैठक २ सप्टेंबर या दिवशी होईल. त्यातच नवीन महासचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावांची घोषणा केली जाईल.
न्यासाची बैठक येथील श्री स्वामी मणि रामदास छावणीत दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत झाली. न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास महाराज यांनी स्वतः या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषववले.
भाविकांच्या संख्येत घट झाली नाही !
न्यासाने म्हटले की, विविध आरोप आणि अपप्रचार करूनही श्रीराममंदिरात येणार्या भाविकांच्या संख्येत जराही घट झालेली नाही. हा कोट्यवधी रामभक्तांच्या अतूट श्रद्धेचा पुरावा आहे. यासाठी संत समाज, भाविक आणि अयोध्यावासीय यांचे आभार मानण्यात आले.
विशेष अन्वेषण पथकाचा अहवाल मिळालेला नाही
न्यासाचे सांगितले की, दान मोजणीतील कथित अनियमिततांची चौकशी करणार्या विशेष अन्वेषण पथकाचा अंतिम अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणावर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. तथापि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेली सुनावणी आणि न्यायालयाचा आदेश यांची नोंद घेण्यात आली.
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !