‘श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्या’च्या कामात पुरातत्त्व विभागाकडून अक्षम्य हेळसांड आणि अनेक चुका
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती
अनेक लहान मूर्तींचे अवयव तुटले

कोल्हापूर, २३ जुलै (वार्ता.) – ‘श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्या’च्या संदर्भात पुरातत्त्व विभागाकडून केल्या जात असलेल्या कामाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन, पुरातत्त्व विभाग, लोकप्रतिनिधी, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वच हिंदुत्वनिष्ठांनी पुरातत्त्व विभागाच्या कामाविषयी तीव्र संताप व्यक्त करत अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या सर्व गोष्टींसाठी पुरातत्त्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांच्यासह सर्व उत्तरदायींविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची आग्रही मागणी सर्वांनी केली. या बैठकीत विलास वहाणे यांच्यासह कामासाठी नेमण्यात आलेल्या खासगी आस्थापनाच्या अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

सर्वांचे म्हणणे ऐकून जिल्हाधिकारी तथा ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’चे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांनी ‘प्रशासकीय स्तरावर ज्या चुका झाल्या आहेत, त्या यापुढील काळात होणार नाहीत, याची काळजी घेऊ. आतापर्यंत झालेल्या कामाच्या संदर्भात पडताळणी करून कारवाई करण्याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल’, असे घोषित केले. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी ‘सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या भावना योग्य असून चालू असलेले काम योग्य पद्धतीनेच झाले पाहिजे. मंदिरातील ज्या कामामुळे जी हानी झाली आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे. ज्या कामासाठी तज्ञ लोकांची नेमणूक करणे अपेक्षित आहे, तिथे तज्ञ लोकांची नेमणूक करा. पुढची सर्व कामे करतांना ती काटेकोरपणे आणि योग्य पद्धतीनेच झाली पाहिजेत. श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती होते, हे अत्यंत अयोग्य असून असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही’, अशी चेतावणी दिली.
या बैठकीत हिंदु जनजागृती समिती, हिंदु एकता आंदोलन, शिवसेना, हिंदु महासभा, विश्व हिंदु परिषद, मंदिर महासंघ, श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील पुजारी, देवस्थानाचे पदाधिकारी यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी त्यांची मते मांडली.

हिंदुत्वनिष्ठांनी घेतलेले प्रमुख आक्षेप
१. मंदिराचे काम करतांना ‘सँड ब्लास्टिंग’चा (वाळूचा वापर करून बंदूकीत ती भरून जोराने दगडावर पाण्याच्या फवार्यासारखी मारण्याची करण्यात येणारी कृती) वापर करण्यात येत आहे. यामुळे अनेक लहान-लहान मूर्तींचे कान-नाक, डोळे, तसेच अवयव तुटले आहेत, अनेक छोट्या मूर्ती या पूर्णपणे झिजल्या असून त्यांची भरून न येणारी हानी झाली आहे.
२. गत महिन्यात मंदिरावर बसवण्यात आलेला कळस कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी न करता बसण्यात आला. कळस बसण्यासाठी शंकराचार्य अथवा कोणत्याही धार्मिक अधिकारी व्यक्तीस बोलावण्यात आले नाही. श्रेयवादासाठीच घाईघाईने ही कृती केली गेली.
३. मंदिर परिसरातील पुरातन असा कारंजा एका रात्रीत तोडण्यात आला. या संदर्भातील कोणतेही समाधानकारक उत्तर मंदिर समितीने दिली नाही.
४. मंदिर परिसरातील दगड स्वच्छ करतांना अनुमती नसतांना ‘ब्रेकर’ वापरणे, मातृलिंग मंदिरात कामगारांनी झोपणे यांसह अनेक अपप्रकार उघडकीस आले आहेत.
५. मंदिरातील मूर्तीचे संवर्धन चालू असतांना त्या योग्य पद्धतीने जतन करून न ठेवता त्या पोत्यात भरून ठेवण्यात आल्या आहेत.
६. ‘गरुड मंडपा’चे काम गेली ३ वर्षे चालू असून प्रत्येक वेळी कामास मुदतवाढ दिली जात आहे.
विलास वहाणे यांना हिंदुत्वनिष्ठांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागले
बैठक संपल्यावर पुरातत्त्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांना हिंदुत्वनिष्ठांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागले. ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे आणि ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर यांनी विलास वहाणे यांना ‘तुम्ही मंदिरे, गड-दुर्ग यांची प्रचंड हानी केली आहे. विशाळगड येथील मंदिरांची दुरवस्था तुमच्यामुळे झाली आहे. अनेक मंदिरांची कामे तुमच्यामुळे रखडली आहेत. श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात सध्या जे काही अयोग्य चालू आहे, त्याला सर्वस्वी तुम्हीच उत्तरदायी आहात. त्यामुळे तुमच्याविरुद्ध गुन्हे नोंद न झाल्यास तुम्हाला कोल्हापुरी हिसका दाखवू’, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी तेजस गर्गे आणि साहाय्यक संचालक विलास वहाणे या दोघांकडून हे काम तात्काळ काढून घेण्यात यावे. विलास वहाणे हे कधीच माहिती देण्यासाठी उपलब्ध नसतात. प्रत्येक चुकीच्या कामासाठी विलास वहाणे हेच उत्तरदायी आहेत, असा आरोप या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी केला.
पुरातत्त्व विभागाकडून श्री महालक्ष्मीदेवी मूर्ती संवर्धानाच्या संदर्भात अक्षम्य हेळसांड ! – प्रसन्न मालेकर
श्री महालक्ष्मीदेवी मूतीच्या संदर्भात पुरातत्त्व विभागाकडून जे संवर्धन केले जाते, त्यावर तीव्र आक्षेप घेत अधिवक्ता प्रसन्न मालेकर म्हणाले, ‘‘देवीच्या मूर्तीचे एक किंवा दोन वेळा प्राण काढून घेणे समजू शकतो; मात्र पुरातत्त्व विभाग वर्षातून दोन वेळा मूर्तीचे काम करण्यासाठी प्राण काढून घेत आहे. काही वेळा अमावास्या असतांना ही कृती केली गेली आहे. मूर्तीची स्थिती जर चांगली असल्याचे सांगितले जाते, तर वर्षातून २-२ वेळा वज्रलेप का करावा लागतो ? मंदिराची आता जी कामे चालू आहेत, त्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधींचे पालन केले जात नाही. सुवर्णकळस बसवतांना कोणत्याही प्रकारचा मुहूर्त न पहाता तो बसवण्यात आला. श्री जोतिबा देवस्थानामध्येही अशाचे प्रकारचे अत्यंत अयोग्य प्रकारे संवर्धनाचे काम चालू असून त्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावण्यात यावी.’’
मनकर्णिका कुंड लवकरात लवकर भाविकांसाठी खुले करा ! – शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समिती
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘अत्यंत प्राचीन आणि पवित्र असलेले मनकर्णिका कुंड बुजवून त्यावर शौचालय बांधण्याची अत्यंत अयोग्य कृती प्रशासनाने केली. हे कुंड खुले करण्याचे काम गेली अनेक वर्षे चालू असून ते काम रेंगाळत आहे. हे कुंड लवकरात लवकर भाविकांसाठी खुले करावे.’’
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती