
नवी देहली – जंतरमंतरवर जमलेल्या त्या ‘कॉकरोच’ना पाहून मला बांगलादेशामधील जुलै २०२४ च्या आंदोलनाची आठवण झाली. विद्यार्थ्यांनी ‘कोटा (आरक्षण) कि गुणवत्ता ? गुणवत्ता, गुणवत्ता’, अशा घोषणांनी प्रारंभ केला होता. अंततः त्यांनी सरकार पाडण्याची मागणी केली. त्यानंतर जे काही घडले, त्याची किंमत आता संपूर्ण बांगलादेशाला मोजावी लागत आहे. तिथे कट्टरपंथी जिहाद्यांनी सत्ता हस्तगत केली आहे. क्रौर्य, जातीयवाद, धार्मिक कट्टरतावाद, स्त्रीद्वेष, आतंकवाद आणि अराजकता यांमुळे देश उद्ध्वस्त होत आहे, असे बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
विद्यार्थी आंदोलन लोकशाहीचा पुरस्कार करतेच असे नाही !
नसरीन यांनी पुढे म्हटले आहे की, जुलै महिन्यातील त्या आंदोलनापासून जेव्हा मला विद्यार्थी कुठेही एकत्र जमतांना दिसतात, तेव्हा मला अस्वस्थता किंवा भीती वाटते. अशा जमावांवर आता माझा सहजपणे विश्वास बसत नाही. जुलै २०२४ मधील घटनांनी मला हे शिकवले की, प्रत्येक विद्यार्थी आंदोलन लोकशाहीचा पुरस्कार करतेच, असे नाही, सरकारविरोधी प्रत्येक आंदोलनामुळे स्वातंत्र्य मिळतेच, असे नाही आणि प्रत्येक क्रांती ही खर्या अर्थाने क्रांती असतेच, असेही नाही. काही क्रांती जुनी सत्ता उलथून टाकतात; पण त्यातून अधिक भयावह असा अंधार पसरतो, अशी भीती नसरीन यांनी व्यक्त केली.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद