खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक !

चौघेही जण हिंदु असल्याचे उघड

खोपोली (जिल्हा रायगड) – खोपोलीतील १८ व्या शतकातील ऐतिहासिक श्री भगवान वीरेश्वर (विश्वेश्वर) मंदिरात १९ जुलैच्या मध्यरात्री चोरी करण्यात आली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करून २८ लाख रुपये किमतीची अन् १७ किलो वजनाची चांदीची संपूर्ण पिंड (मुखवटा आणि आवरण) चोरली. पोलिसांनी अन्वेषण करत पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून ४ सराईत चोरट्यांना अटक केली आहे. अमोल कसबे, विकास अगिवले, दिलीप जाधव आणि सखाराम गायकवाड अशी त्यांची नावे आहेत.

भाविकांना केवळ पुढच्या दरवाजातून प्रवेश दिला जात असल्याने मंदिराचा मागचा दरवाजा नेहमी बंद असायचा; मात्र चोरांनी मागच्या दरवाजाची साखळी आणि कुलूप तोडून गाभार्‍यात प्रवेश केला आणि चोरी केली. दुसर्‍या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी आलेले साहाय्यक पुजारी किशोर शिगवान यांना चोरीची घटना लक्षात येताच त्यांनी मंदिर विश्वस्तांना याविषयी कळवले. त्यांनी तक्रार प्रविष्ट केली. सीसीटीव्ही चित्रणात चोरीचा प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपींकडून सर्व सर्व वस्तू जप्त केल्या आहेत.

संपादकीय भूमिका

मंदिरात चोरी करणारे हिंदू हे हिंदु धर्मभक्षकच होत ! अशांना सरकारने कठोर शिक्षा करणे आवश्यक !