
पॅरिस (फ्रान्स) – देशाच्या संसदेने १५ वर्षांखालील मुलांनी सामाजिक माध्यमांचा वापर करण्यावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत केले. यामुळे फ्रान्स असा कायदा करणारा युरोपीयन युनियनमधील पहिला देश बनला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या विधेयकाचे समर्थन करत ते सप्टेंबरपासून लागू करण्याची सिद्धता केली आहे. फ्रान्सनंतर ब्रिटन, स्पेन, ग्रीस आणि डेन्मार्क हे देशही सामाजिक माध्यमांच्या वापरासाठी किमान वय निश्चित करण्याच्या सिद्धतेत आहेत.
कायदा संमत केल्यावर मुलांच्या वयाची पडताळणी कशी केली जाईल ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फ्रान्समधील अनेक पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काही किशोरवयीन मुलांनी ‘ऑनलाईन’ शैक्षणिक सामग्री मिळणे, तसेच मित्रांशी संपर्क साधणे या गोष्टींवर परिणाम होईल, असे म्हटले आहे. देशाचे शिक्षणमंत्री, तसेच ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ ही मानवाधिकार संघटना यांनीही म्हटले आहे की, केवळ बंदी पुरेशी नाही, तर मुलांना डिजिटल जगाच्या सुरक्षित वापराविषयी शिक्षित करणेही आवश्यक आहे.
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !