
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), १४ मार्च (वार्ता.) – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अधिकाधिक हिंदूंना पहाता यावा यासाठी शिराळा युवक संघटनेचे संस्थापक आणि माजी सरपंच श्री. देवेंद्र पाटील यांनी या चित्रपटाची १०० तिकीटे विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. या संदर्भात श्री. देवेंद्र पाटील म्हणाले, ‘‘काश्मिरी हिंदूंवर त्या काळात जे अत्याचार झाले, त्याची दाहकता लोकांपर्यंत पोचणे अत्यावश्यक आहे. त्या काळात हिंदूंनी जे भोगले किमान यापुढील काळात तरी तशी वेळ येऊ नये यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय जाणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंदूंनी जागृत होण्यासाठीच माझा हा अल्पसा प्रयत्न आहे. हा चित्रपट आणखीन लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी प्रयत्नरत आहे. ‘हिंदवी स्वराज्य समुहा’चे अध्यक्ष श्री. शिवकुमार (सनी) आवटे यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी जे प्रयत्न केले. त्यातून प्रेरणा घेऊन हा विचार पुढे आला.’’
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !