बांगलादेशाचे २ तुकडे करून हिंदूबहुल भाग भारताला जोडा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

दादर (मुंबई) येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंचे भारत सरकारला आवाहन !

आंदोलनस्थळी उपस्थित मान्यवर आणि धर्माभिमानी

मुंबई – भारताने बांगलादेशामध्ये सैन्य घुसवून बांगलादेशाचे तुकडे करावेत आणि बांगलादेशातील हिंदूबहुल भाग भारताला जोडावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी केले. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात ११ ऑगस्ट या दिवशी दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाजवळ हिंदु राष्ट्र्र समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेल्या हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनात बोलतांना श्री. सावरकर यांनी वरील आवाहन केले.

या आंदोलनात योग वेदांत समिती, सुयश मित्रमंडळ, सनातन संस्था, मानवसेवा प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डावीकडून सौ. मंजिरी मराठे, श्री. सतीश कोचरेकर, श्री. मिलिंद पोक्षे, श्री. बाबूभाई भवानजी, बोलताना श्री. रणजित, सावरकर, वैद्य उदय धुरी, श्री. अभय वर्तक आणि श्री. नागेश मडवी

या वेळी श्री. रणजित सावरकर म्हणाले, ‘‘वर्ष १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी साहाय्य करूनही बांगलादेश कृतघ्न निघाला. बंगाली मुसलमान, पंजाबी मुसलमानांच्या तुलनेत क्रूरतेमध्ये किंचितही न्यून नाहीत. वर्ष १९४६ मध्ये बंगालमधील नोआखाली येथील दंगलीच्या वेळी बंगाली मुसलमानांनी हिंदूंची गावे नष्ट करून महिलांवर अत्याचार केले. त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. बांगलादेशातील आंदोलन हिंदूविरोधी झाले आहे. भारत सामर्थ्यशाली आहे; मात्र राजकारणामुळे नपुसंक झाला आहे. भारत सरकारने बांगलादेशाच्या विरोधात तत्परतेने कारवाई करावी.’’

फलक धरून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविषयी जागृती करताना समस्त हिंदू

या आंदोलनात दादर येथील व्यापारी श्री. बाबूभाई भवानजी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा सौ. मंजिरी मराठे, अधिवक्ता रिम्पल त्रिवेदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सरचिटणीस श्री. नागेश मडवी हे सहभागी झाले होते. मुंबईसह उपनगर, ठाणे येथील हिंदू या आंदोलनात सहभागी झाले होते. हातात फलक धरून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविषयी जागृती करण्यात आली.

हिंदूंच्या नरसंहाराविषयी बांगलादेशी प्रसारमाध्यमे गप्प आहेत ! – महेश वासू, मानवाधिकार कार्यकर्ते

बांगलादेशातील स्थिती अत्यंत भयावह आहे. हिंदूंचे मृतदेह झाडाला उलटे लटकवण्यात आले आहेत. मंदिरे जाळण्यात आली आहेत. हिंदूंचे मृतदेह जलाशयात फेकण्यात आले आहेत. या सर्व नरसंहाराविषयी बांगलादेशातील प्रसारमाध्यमे गप्प आहेत. भारतातील हिंदूंपर्यंत हा अत्याचार पोचवायला हवा.

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो नाही, तर भारतातील हिंदूंचेही भवितव्य धोक्यात ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

महाराष्ट्रात साडेतीन कोटी मुसलमान आहेत आणि यांमध्ये ८५ लाख बांगलादेशी घुसखोर आहेत. हिंदू आताही जागृत झाले नाहीत, तर भविष्यात हिंदूंच्या मुली, बहिणी आणि मुले सुरक्षित रहाणार नाहीत. भारतात मुसलमान रस्त्यावर उतरले, तर हिंदूंची कुटुंबे सुरक्षित रहाणार नाहीत. बांगलादेशात जी परिस्थिती आली आहे, ती भविष्यात भारतावर येईल. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारतातील हिंदूंनी रस्त्यावर उतरायला हवे. अन्यथा भविष्यात भारतातील हिंदूंचेही भवितव्य धोक्यात येईल. त्यामुळे हिंदूंनी वेळीच संघटित व्हावे.

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंना तात्काळ सुरक्षा पुरवावी ! – वैद्य उदय धुरी, समन्वयक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बांगलादेशातील सरकारविरोधी आंदोलनात जिहादी आणि कट्टरतावादी हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करत आहेत. हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंची घरे आणि दुकाने यांवर आक्रमणे करून ते लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार रोखण्यासाठी भारताने तात्काळ कार्यवाही करावी आणि हिंदूंना सुरक्षा पुरवावी.

स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस हिंदूंचे रक्षण कसे करणार ?

आझाद मैदान दंगलीला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत. मान्यमार येथे मुसलमानांवर अत्याचार झाल्याची अफवा पसरवून सहस्रावधी मुसलमान रस्त्यावर उतरले होते. या वेळी दंगलखोरांनी महिला पोलिसांचे कपडे फाडले; मात्र यातील एकाही गुन्हेगाराला शिक्षा झालेली नाही. ही दंगल आपण विसरलो. जे स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, ते पोलीस हिंदूंचे रक्षण कसे करणार ? असा प्रश्न या वेळी अभय वर्तक यांनी उपस्थित केला.