|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘उत्तरप्रदेश मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे अध्यक्ष हाफिज नूर अहमद अझहरी यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांचा निषेध केला आहे. ‘बांगलादेशात हिंदूंवर ज्या प्रकारे अत्याचार केले जात आहेत, त्यांची मंदिरे उद़्ध्वस्त केली जात आहेत, ती पूर्णपणे मानवतेच्या विरोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी काही पावले उचलावीत’, असे आवाहन अझहरी यांनी केले आहे. नूर अहमद अझहरी यांनी व्हिडिओ संदेश प्रसारित करून मत व्यक्त केले आहे.
नूर अहमद म्हणाले की, चीन आणि पाकिस्तान यांचा यामागे हात आहे. अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानांनी बांगलादेशाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यायला हवा. संपूर्ण देशातील जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. इस्लाम कुणाचेही प्रार्थनास्थळ पाडण्याची किंवा जाळण्याची अनुमती देत नाही. हे सर्व जो करत आहे तो मानवतेविरुद्ध काम करत आहे. या अत्याचाराला आपण सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे.
संपादकीय भूमिकादेशातील केवळ एकाच मुसलमान नेत्याला असे बोलावेसे वाटते, यावरून देशात कोणत्या मानसिकतेचे अल्पसंख्यांक रहातात, हे लक्षात घ्या ! |