|
ढाका (बांगलादेश) – शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचे त्यागपत्र देऊन देश सोडल्यापासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालू झाले आहेत. बांगलादेशातील प्रसारमाध्यमांमध्ये देशभरातून हिंदु समाजाची घरे आणि मंदिरे यांच्यावर झालेल्या आक्रमणांच्या बातम्या प्रसारित करण्यात येत आहेत. या बातम्यांनंतर जगभरातील अनेक कट्टरतावादी मुसलमानांनी आनंद व्यक्त केला आहे. काहींनी तर ‘बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार व्हावा’, ही अपेक्षाही व्यक्त केली आहे. स्वत:ला ‘इस्लामी विद्वान’ म्हणवून घेणारा अमेरिकेतील अबू नजम फर्नांडो बिन अल-इस्कंदर याने बांगलादेशातून हिंदूंना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचे आवाहन केले आहे. इस्लामी न्यायशास्त्राचा हवाला देत त्याने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, हिंदूंकडे दोनच पर्याय आहेत, पहिला पर्याय हा मृत्यूला कवटाळणे, तर दुसरा इस्लाम स्वीकारणे होय.
त्याने पुढे म्हटले की, इस्लामी देशांमध्ये राहून हिंदूंनी दुय्यम जीवन स्वीकारले आहे, हे योग्य आहे. तेथील हिंदूंनी मूर्तीपूजा सोडून इस्लामी कायदे आणि नियम यांनुसार आचरण करणे आवश्यक आहे. ‘बांगलादेशावर असलेला हिंदूंचा प्रभाव आणि त्यांच्याकडून होणारा हस्तक्षेप यांपासून देश मुक्त होईल’, अशी आशा त्याने व्यक्त केली.
संपादकीय भूमिका
|