कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाला ! – क्रिस्टोफर व्रे, संचालक, एफ्.बी.आय

एफ्.बी.आय.च्या संचालकांचा दावा

क्रिस्टोफर व्रे

वॉशिंग्टन (अमेरिका) – कोरोनाच्या उत्पत्तीविषयी आम्ही गेल्या काही वर्षांपासून संशोधन करत आहोत. यात आम्ही जी निरीक्षणे नोंदवली आहेत, त्यानुसार कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याची दाट शक्यता आहे, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर अन्वेषण विभागाचे (एफ्.बी.आय.चे) संचालक क्रिस्टोफर व्रे यांनी केला. ते येथे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ‘विशेष म्हणजे यासंदर्भात कुणीही संधोधन करत असेल, तर चीन सरकारकडून त्यांच्या कामात अडथळे आणले जातात’, असा दावाही त्यांनी या वेळी केला.