पाकिस्तानमध्ये  १२ हून अधिक जिहादी आतंकवादी संघटनांची मुख्य केंद्रे ! – भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांची स्पष्टोक्ती !

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानमध्ये कमीतकमी १२ हून अधिक जिहादी आतंकवादी संघटनांची मुख्य केंद्रे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतेही आर्थिक साहाय्य दिले जाऊ नये, असे विधान अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी घोषित केलेल्या निक्की हेली यांनी केले आहे.

हेली या भारतीय वंशाच्या आहेत. काही दिवसांपूर्वीही त्यांनी त्या राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेच्या विरोधात कार्य करणार्‍या देशांना कोणतेही साहाय्य करणार नसल्याची घोषणा केली होती.