तेहरान (इराण) – इराकची राजधानी बगदादमध्ये वर्ष २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन आक्रमणामध्ये इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानी याचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर जेव्हा इराणने अमेरिकेच्या नेतृत्वातील सैन्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले, तेव्हा बिचार्या सैनिकांना मारण्याचा हेतू नव्हता. अल्लाची इच्छा असेल, तर आम्ही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मारू इच्छितो. सुलेमानी यांच्या हत्येचा आदेश देणार्या अमेरिकी सैन्य कमांडर्सना मारले पाहिजे, असे विधान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीराली हाजीजादेह यांनी केले आहे. इराणने १ सहस्र ६५० किलोमीटरपर्यंत मारा करणार्या क्रुझ क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर हाजीजादेह बोलत होते.
ईरान ने 1650 किमी की मारक क्षमता वाली एक क्रूज मिसाइल डवलप की है. https://t.co/y30SDPh5vh
— AajTak (@aajtak) February 25, 2023