|
कीव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाला लवकरच १ वर्ष पूर्ण होईल. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अचानकपणे युक्रेनचा दौरा करून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. रशियाचा विरोध डावलून बायडेन यांनी केलेल्या युक्रेनच्या दौर्यामुळे अनेक देशांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या भेटीविषयी अन्य कुणालाही पुसटशीही कल्पना नव्हती. हे रशियन गुप्तचर यंत्रणांचे अपयश मानले जात आहे. रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सर्वप्रथम आक्रमण केले होते. तेव्हापासून आजपावेतो उभय देशांत युद्ध चालू आहे.
यूक्रेन पर हमले का एक साल पूरा होने से पहले अचानक कीव पहुंचे जो बाइडेन, हर कोई हैरान https://t.co/i321rzjzhV
— Hindustan (@Live_Hindustan) February 20, 2023
अमेरिकेने या युद्धात रशियाच्या विरोधात युक्रेनला सर्वतोपरी साहाय्य केले आहेत. त्यामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातील दरी आणखी रूंदावली आहे. याही भेटीत बायडेन यांनी युक्रेनला आणखी शस्त्रास्त्रे पुरवण्याची, तसेच अत्याधुनिक अशी ‘एअर सर्विलंस रडार’ यंत्रणा देण्याची घोषणा केली. यामुळे हे युद्ध आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.