आता अमेरिकेच्या हवाई परिसरात दिसला हेरगिरी करणारा फुगा !

होनोलुलु (अमेरिका) – अमेरिकेतील हवाई राज्याची राजधानी असलेल्या होनोलुलु येथे हेरगिरी करणारा फुगा उडतांना दिसला. हा फुगा ५० सहस्र फूट उंचीवर असल्याची माहिती मिळाली असली, तरी अमेरिकी अधिकारी आणि हवाई वाहतूक नियंत्रण विभाग यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

यापूर्वी २ फेब्रुवारी या दिवशी अमेरिकेतील मॉन्टाना शहरात हेरगिरी करणारा चिनी फुगा दिसला होता. कॅरोलिना किनार्‍याजवळ ५ फेब्रुवारी या दिवशी अमेरिकन हवाई दलाने एफ्-२२ या लढाऊ विमानातून तो नष्ट केला होता.