पिंपरी (पुणे) – बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे ४ लाख रुपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम स्वीकारतांना चिंचवड कार्यालयातील मंडल अधिकारी सुरेंद्र जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही. – संपादक) ही कारवाई ४ मार्च या दिवशी करण्यात आली. तक्रारदारांनी वाल्हेकरवाडी येथे ६ गुंठे जागा घेऊन त्यावर बंगला बांधला. त्या बंगल्याची नोंद करण्यासाठी ४ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.