सासवड (पुणे) येथे वनरक्षकाला लाच स्वीकारतांना पकडले !

लाचलुचपत विभागाची कारवाई !

सासवड (जिल्हा पुणे) – जवळार्जुन या ठिकाणी तक्रारदाराची ५ एकर शेती आहे. २५ मार्च या दिवशी शेतीत खड्डा खणतांना लागूनच असणार्‍या वन विभागाच्या जागेत खड्डा खणला. त्यामुळे २७ मार्चला जेजुरी बीटचे वनरक्षक गोविंद निर्डे यांनी कुणीतरी तक्रार केली आहे, गुन्हा नोंद करावा लागेल, अशी भिती तक्रारदारास दाखवली.

वन विभागाच्या परिसरातील खड्डा बुजवूनही निर्डे यांनी दूरध्वनी करून तक्रारदाराला २ लाख रुपये घेऊन जेजुरी येथे भेटण्यासाठी बोलावले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे निर्डे यांची तक्रार केली. त्यामुळे तक्रारदाराकडून पैसे स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्त भारती मोरे यांनी गुन्हा नोंद करून निर्डे यांना अटक केली.

संपादकीय भूमिका

कोणताही विभाग भ्रष्टाचारमुक्त नसणे, हे दुर्दैवी !