
प्रयागराज – येथे चालू असलेल्या महाकुंभपर्वात उत्तरप्रदेश सरकारचे संसदीय कार्य मंत्री सुरेश खन्ना यांनी येथील त्रिवेणी संगमक्षेत्री उभारण्यात आलेल्या ‘संविधान कक्षा’चे उद्घाटन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अलाहबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे.जे. मुनीर, तर अध्यक्ष म्हणून ‘दिव्य प्रेम सेवा मिशन’चे अध्यक्ष डॉ आशीष गौतम उपस्थित होते. या वेळी या दोघांनी कक्षातील प्रदर्शनाचे अवलोकन केले. या प्रदर्शनात देशाच्या संविधानावर आधारित पुस्तके आणि ग्रंथालय यांचा समावेश आहे. उद्घाटन समारंभाग भारतीय सैन्याच्या बँड पथकाने ‘वन्दे मारतम्’ सह अनेक देशभक्तीपर गीतांच्या धूनवर संगीतमय कार्यक्रम प्रस्तुत केला.