Tahawwur Rana Extradition : अमेरिकेतील आरोपी तहव्वूर राणा याला भारताकडे सोपवण्यात येणार

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

आतंकवादी तहव्वूर राणा

वॉशिंग्टन (अमेरिका) – मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणातील पाकिस्तानी वंशाचा आतंकवादी तहव्वूर राणा याला भारताकडे सोपवण्याला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली आहे. भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार ही संमती देण्यात आली आहे. तहव्वूर राणा याला अमेरिकेने वर्ष २००९ मध्ये अटक केली होती.

राणा हा पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. आणि जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा हिचा आतंकवादी आहे. राणा याने या आक्रमणाचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला साहाय्य केले होते. आक्रमणाचा कट रचण्यात राणाची मोठी भूमिका होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे.