प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, २४ जानेवारी (वार्ता.) : हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार कुंभमेळ्याच्या माध्यमातून सर्वत्रच्या हिंदूंपर्यंत पोचावा, यासाठी २२ जानेवारी या दिवशी महाकुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्र एकता पदयात्रा काढण्यात आली. या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याविषयी पदयात्रेच्या मार्गावर उपस्थित नागा साधू, भाविक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या सर्वांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात यावे, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
महाराष्ट्रातील स्वामी जगदीशगिरी महाराज काही वेळ पदयात्रेत सहभागी झाले होते. हिंदु राष्ट्राविषयी ते म्हणाले, ‘‘सनातन धर्माचा जय जयकार व्हायला हवा. विश्वामध्ये सनातन धर्माचा प्रचार व्हायला हवा.’’ |
भाविकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया !
१. भारताची संस्कृती त्यागाची संस्कृती आहे. ऋषीमुनी, संत-महात्मा यांनी विश्वकल्याणाचा विचार मांडला आहे. भारत अनादी काळापासून हिंदु राष्ट्र आहेच; मात्र आता राज्यघटनात्मकदृष्ट्या भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. – श्री. टिळकराज रोतक, हरियाणा
२. हिंदूंच्या देवतांचा आदर व्हायला हवा. भारतात जेवढी मंदिरे आहेत त्यांना तोडण्याचे प्रकार थांबायला हवेत. सर्व हिंदूंनी एकत्र व्हायला हवे. हिंदु राष्ट्राचा विजय असो. – श्री. देवीदयाळ पांडे, मध्यप्रदेश
३. भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हायलाच हवे. त्यासाठी तन,मन धन अर्पण करण्यास आम्ही सिद्ध आहोत. – श्री. नीलेश शुक्ला, प्रयागराज, उत्तरप्रदेश
४. या भूमीत प्रभु श्रीरामाचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही हिंदूंची भूमी आहे. यासाठी भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे. – श्री. आनंद तिवारी, उत्तरप्रदेश
५. विश्वामध्ये हिंदु राष्ट्र होऊ शकेल, असा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी तरुण, वृद्ध आदी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. – श्री. सारंग खाडये, वर्धा, महाराष्ट्र.