Muslims Restaurants In Hindu Names : गुजरातमध्ये मुसलमान हिंदु नावांनी चालवत होते उपाहारगृह : २७ उपाहारगृहांचे परवाने रहित

कर्णावती (गुजरात) – उपाहारगृहांना हिंदूंची नावे ठेवणार्‍या मुसलमान  चालकांवर राज्य सरकारने कारवाई केली आहे. गुजरात राज्य रस्ते वाहतूक विभागाने अशा २७ हॉटेल्सचे परवाने रहित केले आहेत.

गुजरात राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या या हॉटेल्सच्या ठिकाणी थांबत असत. या हॉटेल्सचे परवाने हिंदूंच्या नावाने घेतले होते आणि ते मुसलमान चालवत होते, असे तपासात समोर आले आहे. या संदर्भात गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाला अनेक लोकांकडून लेखी तक्रारीही आल्या होत्या. या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका

व्यवसाय करण्यासाठी मुसलमानांना हिंदूंचे नाव का घ्यावे लागत आहे, हे मुसलमानांचे धर्मगुरु, तसेच निधर्मीवादी, धर्मनिरपेक्षतावादी सांगतील का ?