भ्रमणभाष चोरणार्‍या चोरट्याला कल्याण रेल्वेस्थानकात अटक

कल्याण – कल्याण आणि डोंबिवली या रेल्वेस्थानकांत प्रवाशांचे भ्रमणभाष चोरणार्‍या प्रताप डोके या चोरट्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याने ६ प्रवाशांचे भ्रमणभाष चोरले होते. त्याच्याकडून १ लाख ४७ सहस्र रुपये किमतीचे ४ महागडे भ्रमणभाष पोलिसांनी जप्त केले आहेत. कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानकांत मागील काही महिन्यांपासून प्रवाशांच्या हातामधून, तसेच पिशवीतून भ्रमणभाष चोरण्याचे प्रकार वाढले होते. प्रवासी उतरून रेल्वेस्थानकाबाहेर पडत असतांना त्यांच्या हातामधील भ्रमणभाष हिसकावून तो पळून जात असे. हा चोर कुमशेत (जिल्हा पुणे) येथील आहे.

कल्याण रेल्वेस्थानकात पोलिसांची गस्त चालू असतांना फलाटावर हा चोरटा बराच वेळ घुटमळत असल्याचे पोलिसांना दिसले. साध्या वेशातील पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.

संपादकीय भूमिका 

कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अशा भुरट्या चोरांचे फावते !