राज्यभरात २ लाख बांगलादेशी रोहिंग्यांचे जन्म दाखल्यासाठी अर्ज ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

नागपूर – राज्यभरात २ लाख बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. नागपूर, यवतमाळ आणि अकोला दौर्‍यावर असतांना माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते बोलत होत.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात वर्ष २०२४ मध्ये २ लाख बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केले होते. त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी दबाव आणला होता. आता हे सगळे प्रकरण बाहेर आले आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणाची विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.’’

संपादकीय भूमिका

केवळ महाराष्ट्रात जर अशी स्थिती असेल, तर देशातील सर्वच राज्यांमध्येही या दृष्टीने अन्वेषण व्हायला हवे !