महाराष्ट्रातील कुख्यात गुन्हेगाराला अहिल्यानगर येथून अटक

महाराष्ट्रात हत्या, दरोडे, बलात्कार, घरफोडी आदी गंभीर स्वरूपाचे ४७ गुन्हे नोंद असलेला आणि राज्यातील सर्व पोलीस यंत्रणा शोधात असलेला आटल्या उपाख्य अतुल ईश्‍वर भोसले (वय २७ वर्षे) या गुन्हेगाराला सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर येथून अटक केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्यातील स्थान आयोजकांनी समजून घ्यावे !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नसणे, हा सावरकरद्वेषच !

पर्वरी येथील श्री खाप्रेश्‍वर देवस्थानच्या स्थलांतराला विरोध

पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. आम्हालाही हा रस्ता हवा आहे; मात्र आमची आस्था असलेले श्री खाप्रेश्‍वर देवस्थान आणि वड यांना हानी पोेचवून आम्हाला हा विकास नको आहे, असे मत स्थानिक नागरिक शंकर फडते यांनी व्यक्त केले आहे.

बांगलादेशातील इस्लामी हिंसाचारामुळे त्याची होत आहे घसरण !

हसीना यांच्या हकालपट्टीनंतरच्या ४ मासांमध्ये हिंसाचारात शेकडो बांगलादेशी मारले गेले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, रस्त्यावर लोक एकमेकांचे रक्त सांडत आहेत.

गुडघ्याचे शस्त्रकर्म झाल्यावरही शांत, स्थिर आणि आनंदी रहाणारे सद्गुरु नंदकुमार जाधव !

‘माझ्या बाबांना (सद्गुरु नंदकुमार जाधव यांना) मागील ४ – ५ वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होत होता. ८.१०.२०२४ या दिवशी त्यांच्या पायाच्या उजव्या गुडघ्याचे (‘नी रिप्लेसमेंट’चे) शस्त्रकर्म आधुनिक वैद्य भास्कर प्राणी यांच्या मिरज येथील रुग्णालयात झाले.

सृष्टीरचनेच्या प्रक्रियेविषयी अंबरनाथ (ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

‘लहानपणापासून माझ्या मनात पुढील प्रश्न यायचे, ‘या जगात पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि तारे नसते, तर काय झाले असते ? ही सृष्टी कशी बनली असेल? जेव्हा काहीच नव्हते, तेव्हा जगाची स्थिती कशी होती ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीची आणि मंदिराची प्रतिकृती, तसेच अन्य वस्तू बनवणारा पनवेल येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. काव्यांश विक्रम जुनघरे (वय ९ वर्षे) !

‘कु. काव्यांशला विविध गोष्टी, उदा. कागदी पुठ्यापासून मंदिर बनवणे, खोली बनवणे इत्यादी बनवण्याची आवड आहे. मी त्याला ‘तुला हे कसे जमते ?’, असे विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘मी आधी प्रार्थना करतो आणि नंतर मला हे बनवता येते.’

एकोशी येथील सरकारी शाळेची भूमी बळकावली

भूमी बळकावल्याच्या प्रकरणाचे लोण आता सरकारी प्राथमिक शाळेपर्यंत पोचले आहे. राज्यातील पहिल्या सरकारी प्राथमिक शाळांपैकी एक असलेली हळर्ण-एकोशी येथील शाळेची भूमी काही व्यक्तींकडून बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गुरुबोध

जी भूमी आपल्याला दिसलेली नाही, जे ज्ञान आपल्याला झालेले नाही, अशी प्रचंड भूमी आहे, तिला ‘परलोक’ म्हणतात. हे जाणायचे असेल, तर शरणागती आवश्यक आहे. 

गोवा सरकार लवकरच इयत्ता चौथी आणि आठवी यांसाठीचे उत्तीर्ण धोरण रहित करणार

केंद्र सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवी यांसाठीचे उत्तीर्ण धोरण रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकार केंद्राचे हे धोरण गोव्यात चालू वर्षी किंवा पुढील शैक्षणिक वर्षी लागू करू शकते; मात्र यासाठी केंद्राने राज्य सरकारला अधिकृतपणे यासंबंधी आदेश दिला पाहिजे.