गुरुबोध

पू. गुरुनाथ मुंगळे महाराज

१. जी भूमी आपल्याला दिसलेली नाही, जे ज्ञान आपल्याला झालेले नाही, अशी प्रचंड भूमी आहे, तिला ‘परलोक’ म्हणतात. हे जाणायचे असेल, तर शरणागती आवश्यक आहे.

२. सगुण हे निर्गुणासाठी आहे आणि निर्गुण हे सगुणासाठी आहे. एकूण सगुण आणि निर्गुण यांच्या संदर्भात केलेल्या खटाटोपातून शून्यावस्थेची प्रचीती येते.

३. वेदांत, तत्त्वज्ञान, ज्ञान-विज्ञान, ऐहिक आणि पारलौकिक, या सर्वांचाच उदय सर्वगत चैतन्यातून असल्यामुळे या सर्व गोष्टी, म्हणजे चैतन्यप्रवाहावरील बुडबुडे होत.

– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)