सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीची आणि मंदिराची प्रतिकृती, तसेच अन्य वस्तू बनवणारा पनवेल येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. काव्यांश विक्रम जुनघरे (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. काव्यांश जुनघरे हा या पिढीतील एक आहे !

कु. काव्यांश जुनघरे

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

–  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. भावपूर्ण प्रार्थना करून देवतांच्या मूर्ती, मंदिराची प्रतिकृती आणि वैशिष्ट्यपूर्ण वस्तू बनवणे 

‘कु. काव्यांशला विविध गोष्टी, उदा. कागदी पुठ्यापासून मंदिर बनवणे, खोली बनवणे इत्यादी बनवण्याची आवड आहे. मी त्याला ‘तुला हे कसे जमते ?’, असे विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘मी आधी प्रार्थना करतो आणि नंतर मला हे बनवता येते.’’ काव्यांशच्या संदर्भात लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे तो देवतांच्या मूर्ती, मंदिराची प्रतिकृती हे सर्व कोणतेही छायाचित्र समोर न ठेवता बनवतो.

सौ. अमृता जुनघरे

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ब्रह्मोत्सवाच्या वेळी ज्या रथात बसले होते, तसा रथ बनवणे  

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा वर्ष २०२३ मध्ये ब्रह्मोत्सव होता. काव्यांशने ब्रह्मोत्सव पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले ज्या रथात बसले होते, त्या पद्धतीचा रथ ‘क्ले’च्या (खेळणी बनविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मातीच्या) साहाय्याने बनवण्याचा प्रयत्न केला.

कु. काव्यांश याने कागदी पुठ्ठ्याच्या साहाय्याने बनवलेले गणपतीचे मंदिर 

३. कागदी पुठ्ठ्याच्या साहाय्याने बनवलेल्या परात्पर गुरुदेवांच्या खोलीत त्यांचे अस्तित्व जाणवणे 

मे २०२३ मध्ये काव्यांशने सुटीत माझे साहाय्य घेऊन कागदी पुठ्ठ्याच्या साहाय्याने परात्पर गुरु डॉक्टरांची खोली बनवली होती. ती खोली बनवून झाल्यानंतर काही दिवसांनी त्याने सांगितले, ‘‘त्या खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत आहे.’’

४. अयोध्या येथे श्रीराममंदिराची स्थापना झाली. त्या वेळी त्याने पुठ्ठ्याच्या साहाय्याने श्रीराममंदिराची प्रतिकृती बनवली होती. 

५. नामजप करत शिवपिंडी आणि श्री गणेश यांच्या मूर्ती बनवणे 

काव्यांशला भगवान शिव आणि श्री गणेश या देवता विशेष आवडतात. त्याने ‘क्ले’च्या साहाय्याने शिवपिंडी आणि श्री गणेश यांच्या मूर्ती बनवल्या आहेत. तो देवतेचा नामजप करत देवतेची मूर्ती बनवतो. त्याने कागदी पुठ्ठ्याच्या साहाय्याने गणपतीचे मंदिर बनवले आहे.

६. ‘त्याने बनवलेल्या कलाकृती परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर पहाणार आहेत’, असा त्याचा भाव असतो.’ 

– सौ. अमृता जुनघरे (कु. काव्यांशची आई), नवीन पनवेल, जिल्हा रायगड. (१९.११.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.