नवी मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी !

भगवान श्रीराम यांच्या आहाराविषयी विकृत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी नवी मुंबई विश्व हिंदु परिषदेच्या वतीने सीबीडी पोलीस ठाण्यात बेलापूर प्रखंड मंत्री स्वरूप पाटील यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेची शताब्दी ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या अजरामर गीताने साजरी !

पुणे येथील येरवडा कारागृहासमोर समूहगायन !

विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांशी भेट म्हणजे न्यायमूर्तींनी आरोपीला भेटणे होय ! – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील, तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची ? यांची मिलिभगत आहे का ?

अमित ठाकरे यांच्याकडून मला जिवे मारण्याचा प्रयत्न ! – महेश जाधव, माथाडी नेते यांचा आरोप

२० वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने वागवता. केवळ पैशासाठी काम करणारी ही संघटना आहे, असा आरोप मनसेचे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ‘ईडी’ची धाड !

जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ‘जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचे पंचतारांकित हॉटेल बांधले’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

दहिसरमधील (जिल्हा ठाणे) धोकादायक इराणी मशिदीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून पाडून टाका !

ठाणे जिल्ह्यात बांधण्यात येणार्‍या या आशिया खंडातील सर्वात मोठ्या इराणी मशिदीच्या कामाला अनेक ठिकाणांहून आर्थिक पुरवठा झाला; मात्र कै. आनंद दिघे यांच्या प्रखर विरोधानंतर या कामाला वर्ष १९९५ मध्ये ९९ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

Maldives Tourism Condemns Comments: मालदीवच्या पर्यटन विभागाकडूनही त्यांच्या मंत्र्यांच्या विधानांचा निषेध !

पंतप्रधान मोदी यांच्यावरील अपमानास्पद टीकेनंतर भारतीय नागरिकांकडून मालदीववर बहिष्कार घालण्याचे, तसेच पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचे आवाहन केले जात आहे.

Ram Temple Car Rally Houston: अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ह्यूस्टन (अमेरिका) येथे भक्तांनी काढली वाहनफेरी !

श्रीराममंदिराच्या छायाचित्रासह भारतीय ध्वज आणि अमेरिकन ध्वज घेऊन ५०० हून अधिक लोक या वाहनफेरीत सहभागी झाले होते.

‘फूड सिक्युरिटी आर्मी’साठी प्रशिक्षण चालू करावे ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शेतमजूर नसल्याने सध्या शेतीखालील भूमी न्यून होत आहे. त्याचसमवेत शेतमजूर म्हणून काम करतांना कमीपणा वाटू नये; म्हणून त्यांना सैनिकांसारखे प्रशिक्षण द्यायचे.

स्वामी स्वरूपानंदांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी-पावस सायकल दिंडी

‘ओम राम कृष्ण हरि’ नामगजर करत अनुमाने ३७ कि.मी.ची दिंडी स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून काढण्यात आली.रत्नागिरीतून ३० सायकलस्वार सहभागी झाले.