१२५ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या खुटे याची मालमत्ता शासनाधीन !

‘मल्टीलेव्हल मार्केटिंग’ योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या विनोद खुटे याच्यावर कारवाई झाली असून अंमलबजावणी संचालनालयाने त्याची ३८ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

राज्यात मानवाकडून मैला उचलण्याची कामे बंद ! यंत्राद्वारेच स्वच्छता होणार !

राज्यात ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी ५०२ कोटी ४० लाख रुपये इतका निधी शासनाकडून संमत करण्यात आला आहे.

पिंपरी येथील शाळेच्या स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही लावले !

‘जयहिंद हायस्कूल’च्या स्वच्छतागृहातील प्रकाराच्या विरोधात सामाजिक माध्यमातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. पालकांनीही विरोध केला. १६ मार्च या दिवशी पालकांनी शाळेमध्ये गर्दी करून त्या विरोधात निषेध व्यक्त केला.

काँग्रेसमध्ये नेहरू घराण्यातील व्यक्तीकडेच नेता म्हणून पाहिले जाते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला, तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचे असेल, तर त्यांनी अवश्य यावे; पण स्वतःच्या शक्तीवर यावे.

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले !

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. १५ मार्च या दिवशी त्यांनी मावळते आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

डॉ. सायरस पुनावाला यांना ‘आण्णासाहेब चिरमुले’ पुरस्कार प्रदान !

‘कै. वा.ग. तथा आण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘आण्णासाहेब चिरमुले’ पुरस्कार हा पुरस्कार देण्यात येतो. वर्ष २०२१चा पुरस्कार पुणे येथील पद्मभूषण डॉ. सायरस पुनावाला यांना नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

जळगाव येथे गोरक्षक संजय शर्मा यांचे पोलिसांच्या अन्याय्य वागणुकीच्या निषेधार्थ शिवतीर्थ येथे उपोषण !

गोरक्षकांची तळमळ आणि संघर्ष समजून न घेता अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांनाच त्रास देणारे प्रशासन पापाचे भागीदार होईल, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

मोठ्या चित्रकारांची मूळ चित्रे असल्याचे भासवून बनावट चित्रे विकणारी टोळी गजाआड !

प्रसिद्ध चित्रकारांची मूळ चित्रे असल्याचे भासवून बनावट चित्रांच्या विक्रीद्वारे १७ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश राजपाल आणि इतर आरोपी यांवर ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेत भारताला धर्मनिरपेक्ष ठेवण्याचे आवाहन !

हिंदु धर्माला ‘मलेरिया’ म्हणणार्‍या उदयनिधी स्टॅलिन यांचीही उपस्थिती !

शीव (मुंबई) येथील मानव सेवा संघाच्या आश्रमाच्या तिजोरीतील पैसे गायब !

येथील मानव सेवा संघ या अनाथाश्रमाला येणार्‍या देणगीतील सुमारे ३६ लाख रुपये चोरीला गेले आहेत.या आश्रमात काम करणार्‍या एका रोखपालाने टप्प्याटप्प्याने ही रक्कम गायब केल्याचा संशय आहे.