डॉ. सायरस पुनावाला यांना ‘आण्णासाहेब चिरमुले’ पुरस्कार प्रदान !

सातारा, १७ मार्च (वार्ता.) – ‘कै. वा.ग. तथा आण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘आण्णासाहेब चिरमुले’ पुरस्कार हा पुरस्कार देण्यात येतो. वर्ष २०२१चा पुरस्कार पुणे येथील पद्मभूषण डॉ. सायरस पुनावाला यांना नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अर्थशास्त्र आणि सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्‍या उत्कृष्ट व्यक्तीला प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी दत्तोपंत ठेंगडी, डॉ. मनमोहन सिंग, बाळासाहेब विखे-पाटील, डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. नारायण मूर्ती, रतनजी टाटा आदी मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. पुनावाला यांनी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी ठाम विश्वास आणि सामान्यांना परवडणार्‍या लसींचे उत्पादन केले.