वैकुंठचतुर्दशी
कार्तिक शुक्ल चतुर्दशीला ‘वैकुंठचतुर्दशी’ म्हणतात. याविषयी पुराणातील कथा अशी आहे – वाराणसीच्या मनकर्णिका तीर्थात भगवान श्रीविष्णु सहस्र कमळांनी श्री विश्वेश्वराची पूजा करत बसले असता त्यांची परीक्षा पहाण्यासाठी भगवान शंकरांनी त्यातील एक कमळ लपवले.