तरुणपणीच भक्तीमार्गाचा अवलंब करणे क्रमप्राप्त !

ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

भागवत म्हणते, ‘भक्तीमार्गाचा अवलंब कुमार अवस्थेत केला पाहिजे.’ आता हे कुणी सांगत नाही. एखादा तरुण जर आपल्या वडिलांना ‘मी प्रवचनाला जातो’, असे म्हणाला, तर ‘हे काय वय आहे का ?’, असे ते म्हणतात. खरे म्हणजे आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे, असे वाटत असेल, तर तरुण आणि बाल वयात मुलांना ‘प्रवचनाला जा’, असे सांगितले पाहिजे; पण नेमके उलट होते. तरुणपणीच या मार्गाचा विचार केला पाहिजे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘कर्मसंन्यासयोग’)