‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथातील त्यांचे छायाचित्र पहात नामजप करत असतांना सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘माझा नामजप कधी संपला’, ते माझ्या लक्षातच आले नाही. सध्या मला बसून नामजप करण्यात आनंद मिळत आहे आणि माझा दिवसभरात बसून ३ – ४ घंटे नामजप होत आहे.

जया अंगी चैतन्य। तो नर भाग्यवान।।

जो करी आज्ञापालन । गुरुकृपा होईल जाण ।। साधनेमध्ये ‘श्री गुरूंचे आज्ञापालन करणे’ हा सर्व गुणांचा राजा आहे.’

निवडणूक विशेष

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची सलग दुसर्‍या दिवशीही पडताळणी करण्यात आली. या वेळचा व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा प्रसारित केला.

पुणे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास जन्मठेप !

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संजू निकुंभ याला न्यायालयाने जन्मठेप आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला द्यावी, असा आदेश देण्यात आला.

भारताला शत्रूपासून मुक्त करण्यासाठी देशप्रेमी उमेदवारांना निवडून द्या ! – माधवी लता

चुकीच्या व्यक्तीला मतदान केल्यास पुढील ५ वर्षे समाजाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिंदुस्थानला शत्रूपासून मुक्त करण्यासाठी देशप्रेमी उमेदवारांना निवडून द्या. यासाठी १०० टक्के मतदान करा.

फोंडाघाटातील वाहतूक तब्बल १४ घंट्यांनी चालू

सोमवार, ११ नोव्हेंबरला रात्री २ वाजता ३० टन सिमेंटने भरलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने फोंडाघाटात खड्डयात जाऊन अडकला होता. या वेळी ट्रकचे काही टायर फुटले आणि अन्य भाग तुटला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

कुचेली (म्हापसा) येथील सरकारी जागेतील अवैध घरे पाडण्यास प्रारंभ

गोवा शासनाने अवैध घरे उभी रहाण्यास प्रोत्साहन देणारे, तेथील ग्रामपंचायत, त्यांना वीज आणि पाणी देणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यावरही कारवाई केल्यास असे प्रकार थांबतील !