पुणे – ‘महाराष्ट्र योग शिक्षक संघा’चे चौथे योगशिक्षक संमेलन येत्या १६ आणि १७ नोव्हेंबर या दिवशी आळंदी देवाची येथे होणार आहे. या महायोगोत्सवास राज्यातून १ सहस्र योगशिक्षक उपस्थित रहाणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन ‘कैवल्यधाम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुबोध तिवारी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी ‘बेलराईज इंडस्ट्रीज’च्या संचालिका सुप्रिया बडवे, ‘द लोणावळा योग इन्स्टिट्यूट’चे संचालक डॉ. मन्मथ घरोटे, आळंदीतील मारुति महाराज कुरेकर, स्वामी उमानंद, डॉ. राजेंद्र खेडेकर आणि ‘महाराष्ट्र योग शिक्षक संघा’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार उपस्थित असणार आहेत. या महायोगोत्सवात उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.