युक्रेन युद्ध संपवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान पुतिन यांनी गांभीर्याने घेतले !

रशियाने अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान गांभीर्याने घेतले आहे.

भ्रमणभाषच्या ‘रिचार्ज प्लॅन’ची दरवाढ अल्प करण्याच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारचा नकार !

देशातील प्रमुख दूरसंचार आस्थापनांनी काही दिवसांपूर्वी भ्रमणभाषच्या ‘रिचार्ज प्लॅन’च्या किमती ११ ते २५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. केंद्र सरकार किंवा दूरसंचार नियामक असलेल्या ‘ट्राय’ने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

कॅनडामध्ये पुन्हा खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयासमोर काढली फेरी !  

कॅनडातील खलिस्तान्यांना धडा शिकवण्यासाठी कॅनडातील नागरिकांनीच आता प्रयत्न केले पाहिजेत !

रशियाने भारताला ३६ सहस्रांहून अधिक ‘एके-२०३ असॉल्ट रायफल्स’ दिल्या !

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. ८ ते १० जुलै या कालावधीत ते २ देशांना भेट देणार आहेत.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ !

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर येथील परिसर विस्तीर्ण करण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली आहे. नगरपालिकेने पोलीस प्रशासनासह प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटवले.

ग्रंथालयांना अनुदान देण्याविषयी शासनाची नेमकी भूमिका काय ? – प्रवीण दरेकर, गटनेते, विधान परिषद

नवीन ग्रंथालयांना शासन अनुदान देत नाही आणि जी ग्रंथालये पत्र्याच्या पेटीत चालू आहेत, ती अनुदान घेत असतात. त्यामुळे ग्रंथालयांना अनुदान देण्यासंदर्भात राज्य सरकारची नेमकी भूमिका काय ?

शेतीपिकांची हानी आणि वन्यप्राणी आक्रमण यांविषयी तात्काळ कार्यवाहीसाठी अधिकार्‍यांना सूचना ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकर्‍यांची होणारी हानी आणि वन्य प्राण्यांच्या आक्रमणात मृत किंवा घायाळ झालेल्यांच्या साहाय्याविषयी शासन गंभीर आहे. पीक हानीभरपाई मर्यादा ६ सहस्रांवरून ५० सहस्र रुपये करण्यात आली.

पुणे येथे स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभे करणार ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री

पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीविषयी कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ५ पैशांची किंमत नाही का ? – आमदार गणेश नाईक, भाजप

‘सिडको आणि राज्य सरकार यांच्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचे दलाल, भ्रष्ट अधिकारी बसले आहेत. राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत. सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत’, असे विधान भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत मांडले.

संचालक मंडळाच्या जप्त मालमत्तेतून लिलाव करून रक्कम ठेवीदारांना देणार ! – दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री

आदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था यांतील गैरव्यवहाराचे प्रकरण