युक्रेन युद्ध संपवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान पुतिन यांनी गांभीर्याने घेतले !

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाने अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान गांभीर्याने घेतले आहे. ट्रम्प म्हणाले होते, ‘मी रशिया-युक्रेन युद्ध संपवू शकतो.’ यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले की, ट्रम्प युक्रेनमधील युद्ध संपवू इच्छित असल्याचे सांगत आहेत. आम्ही त्यांचे विधान गांभीर्याने घेत आहोत.