पुणे येथे स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभे करणार ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री

श्री. हसन मुश्रीफ

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीविषयी कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. रुग्णालयासमोरील जागा मिळण्याविषयी सकारात्मक निर्णय घेऊन ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ४ जुलै या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या घंट्यांत दिली. ससून रुग्णालयाविषयी सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.