भ्रमणभाषच्या ‘रिचार्ज प्लॅन’ची दरवाढ अल्प करण्याच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारचा नकार !

नवी देहली – देशातील प्रमुख दूरसंचार आस्थापनांनी काही दिवसांपूर्वी भ्रमणभाषच्या ‘रिचार्ज प्लॅन’च्या किमती ११ ते २५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. केंद्र सरकार किंवा दूरसंचार नियामक असलेल्या ‘ट्राय’ने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. ‘सध्या तरी सरकारी अधिकारी हस्तक्षेप करण्याइतकी परिस्थिती गंभीर नाही. ग्राहकांना थोडा बोजा सहन करावा लागणार आहे; कारण ही दरवाढ ३ वर्षांनंतर झाली आहे’, असे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे देशभरातील ग्राहकांना महागड्या प्लॅनचा वापर करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘दूरसंचार आस्थापनांनी सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा’, अशी सूचना केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. (दूरसंचार आस्थापनांनी सेवेचा दर्जा सुधारला नाही, तर सरकार त्यांच्याविरुद्ध काय कारवाई करणार आहे ?, हेही जनतेला स्पष्ट व्हायला हवे ! – सपंदाक)

संपादकीय भूमिका

पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमती अल्प करू न शकणारे सरकार खासगी आस्थापनांचे ‘रिचार्ज प्लॅन’ अल्प करण्यात हस्तक्षेप करील, अशी अपेक्षा करणेच चुकीची आहे !