संचालक मंडळाच्या जप्त मालमत्तेतून लिलाव करून रक्कम ठेवीदारांना देणार ! – दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री

आदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था यांतील गैरव्यवहाराचे प्रकरण

दिलीप वळसे पाटील

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील, यासाठी राज्यशासनाचा प्रयत्न आहे. या बँकेत गैरव्यवहार करणार्‍या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना मिळण्याविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत, अशी माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य हरिभाऊ बागडे यांनी या संदर्भात ४ जुलै या दिवशी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.