पालखी प्रस्थानदिनी देऊळवाड्यामध्ये ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकर्‍यांनाच प्रवेश !

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादिनी देऊळवाड्यामध्ये गर्दी होऊ नये, यासाठी दिंड्यातील ठराविक वारकर्‍यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ‘श्रीं’च्या रथापुढील २०, मागील २७ आणि ९ उपदिंड्या, अशा ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकर्‍यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

संगीत उपासक गुरुवर्य उदयकुमार उपाध्ये यांचा अमृत महोत्सव सोहळा वसई (जिल्हा पालघर) येथे उत्साहात साजरा !

प.पू. (कै.) आबा उपाध्ये आणि प.पू. (कै.) (सौ.) मंगला उपाध्ये यांचे सुपुत्र अन् वसई येथील ‘समाज मंदिर ट्रस्ट’च्या संगीतवर्गाचे गुरुवर्य उदयकुमार उपाध्ये यांचा अमृत महोत्सव सोहळा येथील समाज मंदिर ट्रस्टच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.

माळेगाव (बारामती) येथे चारचाकीमध्ये अवैध गर्भलिंगनिदान करणार्‍या आधुनिक वैद्यासह दलालाला अटक !

माळेगावच्या गोफणेवस्ती येथे बांधकामाच्या ठिकाणी चारचाकीमध्ये ‘पोर्टेबल सोनोग्राफी मशीन’द्वारे गर्भलिंगनिदान सोनोग्राफी करणार्‍या डॉ. मधुकर शिंदे यांच्यासह बाळासाहेब घुले या दलालाला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीची बनावट ‘कस्टम’अधिकार्‍याकडून २० लाख रुपयांची फसवणूक !

मलेशियात पाठवलेल्या काही वस्तूंमध्ये अमली पदार्थ, तुमच्या नावाचे बनावट पारपत्र आणि ‘ए.टी.एम्. कार्ड’ आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तरी तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

बावधन (पुणे) येथील ‘नॅन्सी ब्रह्मा सोसायटी’तील सदनिकाधारकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातातील अग्रवाल कुटुंबाचे आणखी एक प्रकरण उघडकीस

यापुढे शाळांमध्ये आठवड्यातील ३ दिवस असणार ‘स्काऊट-गाईड’चा गणवेश !

इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थिनींसाठी स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑफ फ्रॉक असा गणवेश असणार आहे,

येत्या २ वर्षांत अयोध्येत महाराष्ट्र सदन उभे रहाणार ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

अयोध्या धाम रेल्वेस्थानकापासून महाराष्ट्र सदन साडेचार किलोमीटर अंतरावर आहे. अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून महाराष्ट्र सदन ११ किलोमीटर अंतरावर आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची निवृत्त न्यायामूर्तींकडून चौकशी होणार !

१३ मे या दिवशी घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने १० जून या दिवशी चौकशी समिती नियुक्त केली आहे.

मोशी (पुणे) येथून २ महिलांसह ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बांगलादेशी घुसखोर भारतात येणे हे संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते ! असे होऊ नये, यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक !

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद !

रस्त्यावर खड्डा खोदणार्‍या ठेकेदाराने खड्ड्यास कोणताही संरक्षक कठडा अथवा इतर कोणतीही संरक्षक उपाययोजना केली नव्हती.