घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची निवृत्त न्यायामूर्तींकडून चौकशी होणार !

मुंबई, १० जून (वार्ता.) – १३ मे या दिवशी घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने १० जून या दिवशी चौकशी समिती नियुक्त केली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे या दुर्घटनेची चौकशी होणार आहे. या चौकशी समितीची रचना आणि कार्यकक्षा गृहविभागाकडून निश्चित केली जाणार आहे. चौकशी समितीकडून समयमर्यादेत अहवाल सादर करण्यात येईल, असे शासन आदेशात म्हटले आहे; मात्र नेमका कधीपर्यंत अहवाल सादर करावा, याचे निर्देश शासन आदेशात देण्यात आलेले नाही. घाटकोपर येथील या दुर्घटनेत १६ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ७० हून अधिक नागरिक घायाळ झाले होते. विशेष पोलीस पथकाकडून या दुर्घटनेची चौकशी चालू आहे.