युवा साधिका कु. तनिष्का दत्तात्रय जगताप हिला ‘जेईई मेन’ परीक्षेत ९५.१ टक्के गुण !

येथील सनातनची साधिका सौ. अपर्णा दत्तात्रय जगताप यांची ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी मुलगी कु. तनिष्का दत्तात्रय जगताप हिला १२ वी ‘सायन्स बोर्डा’च्या परीक्षेत ७५ टक्के आणि ‘जेईई मेन’ परीक्षेत ९५.१ ‘परसेंटाईल’ प्राप्त झाले आहेत.

युवा साधक कु. मधुर भूषण भोळे याला ‘जेईई मेन’ परीक्षेत ९७.८ टक्के गुण !

येथील सनातनचे साधक श्री. भूषण भोळे यांचा ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा मुलगा कु. मधुर भूषण भोळे याला १२ वी ‘सायन्स बोर्डा’च्या परीक्षेत ७५ टक्के आणि ‘जेईई मेन’ परीक्षेत ९७.८ ‘परसेंटाईल’ प्राप्त झाले आहेत.

अहिल्यानगर येथे प्रवरा नदीपात्रात बचाव पथकाची बोट उलटून ३ जणांचा मृत्यू !

अकोले तालुक्यात प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करणारी एस्.डी.आर्.एफ्. पथकाची बोट २३ मे या दिवशी उलटली. त्यामुळे बचाव कार्य करणारे सैनिक पाण्यात पडून ३ जण बुडले, तर अन्य बेपत्ता आहेत.

पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकियांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची शक्यता

गोव्यात ७ मे या दिवशी झालेल्या उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झाले. या वेळी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या काही गोमंतकियांनी मतदान केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धार्मिक भावना दुखावणार्‍या कुंकळ्ळी (गोवा) येथील श्रेया धारगळकर हिच्या विधानाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून निषेध

धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस कुणीही करू नये, यासाठी या प्रकरणी कडक कारवाई केली जाणार !

छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीला भ्रमणभाषवर तलाक देणार्‍या पतीसह ७ जणांवर गुन्हा नोंद !

घर घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आण, या मागणीसाठी विवाहितेचा छळ चालू होता. सासर्‍यांना दूरभाष करून पतीने पत्नी रुखसाना सुफियान कुरेशी (२१ वर्षे) यांना तलाक दिल्याची घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडली.

सांगली आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयांतील प्रश्न सोडवण्यासाठी विकास समिती स्थापन करणार !

‘सिव्हिल रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भागवत, पूर्वीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बिंदूसार पलंगे, श्री. उदय जगदाळे, डॉ. प्रसाद चिटणीस यांनी रुग्णालयाची सद्यःस्थिती आणि अडचणी यांविषयी सांगितले.

काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील यांचे निधन !

काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील (वय ७१ वर्षे) यांचे २३ मे या दिवशी खासगी रुग्णालयात निधन झाले.

पालखीच्या पुणे मुक्कामात पोलिसांकडून अडवणूक झाल्यास पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठेवू !

अन्य धर्मियांच्या नव्हे, तर केवळ हिंदूंच्याच धार्मिक गोष्टींत आडकाठी आणणारे पोलीस दुटप्पीच !

ठाणे जिल्ह्यातील डोह आणि ओहोळ आटले !

ठाणे जिल्ह्यातील रणरणते ऊन, तीव्र बाष्पीभवन यांमुळे गावोगावचे पाण्याने भरलेले डोह आणि ओहोळ आटले आहेत. त्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.