पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !
पुणे – येथील सनातनचे साधक श्री. भूषण भोळे यांचा ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा मुलगा कु. मधुर भूषण भोळे याला १२ वी ‘सायन्स बोर्डा’च्या परीक्षेत ७५ टक्के आणि ‘जेईई मेन’ परीक्षेत ९७.८ ‘परसेंटाईल’ प्राप्त झाले आहेत. अभ्यासासह जमेल तशी सेवापण तो करत असे. तो नियमित नामजप प्रार्थना आणि उपाय करत असे. त्यामुळे ‘अभ्यासाचा ताण आला नाही, प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी श्री गणेशाला प्रार्थना केली होती. आतापर्यंत मिळालेले यश हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळे मिळाले आहे’, असे त्याने सांगितले.