पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !
हडपसर (जिल्हा पुणे) – येथील सनातनची साधिका सौ. अपर्णा दत्तात्रय जगताप यांची ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी मुलगी कु. तनिष्का दत्तात्रय जगताप हिला १२ वी ‘सायन्स बोर्डा’च्या परीक्षेत ७५ टक्के आणि ‘जेईई मेन’ परीक्षेत ९५.१ ‘परसेंटाईल’ प्राप्त झाले आहेत. अभ्यासासह ती जमेल तशी सेवापण करत असे. ‘प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी श्री गणेशाला प्रार्थना केली होती. आतापर्यंत मिळालेले यश हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळे मिळाले आहे’, असे तिने सांगितले. तिचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.