|
मुंबई – मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांत यंदापासून पदवी अभ्यासक्रमांसाठी ६०-४० गुणांकन पद्धत लागू होणार आहे. पदवी स्तरावरील बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणि इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे ६०-४० याप्रमाणे मूल्यांकन होईल. त्यानुसार प्रत्येक सत्रातील लेखी परीक्षा ६० गुणांची (बाह्य मूल्यांकन) असेल आणि ४० गुण हे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी (अंतर्गत मूल्यांकन) असतील. या निर्णयाची कार्यवाही शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून कार्यवाही होईल.
१. मुंबई विद्यापिठाशी संलग्नित असलेल्या ८९४ महाविद्यालयांत आतापर्यंत काही अभ्यासक्रमांचे १०० गुणांनुसार आणि काही अभ्यासक्रमांसाठी ७५-२५ अशी गुण विभागणी करून मूल्यांकन होत होते.
२. आता नव्या मूल्यमापन पद्धतीची कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई विद्यापीठ प्रशासनाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना दिले आहेत.